गौड युनियन, स्वामी विवेकानंद विजेते

सेठ गोरधनदास करसोंडास चॅलेंज शील्ड आणि भागुभाई खिचडिया-खार जिमखाना 16 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत अनुक्रमे गौड युनियन स्पोर्ट्स क्लब आणि बोरीवली येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्पूलने विजेतेपद पटकावले.

भागुभाई खिचडिया-खार जिमखाना स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्पूलने पार्ले टिळक विद्यालय (इंग्रजी माध्यम) संघाला हरवले. स्वामी विवेकानंदांच्या यशात महत्त्वाची भूमिका साकारणाऱया यश दुसी याला ‘स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज’ म्हणून गौरविण्यात आले.

सेठ गोरधनदास करसोंडास चॅलेंज शील्ड स्पर्धेत गौड युनियन स्पोर्ट्स क्लबने बाजी मारली. त्यांना 50 हजार रुपयांचा धनादेश आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली. उपविजेत्या विरारच्या अवर्स सीसी 30 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.