स्वप्नील जोशीचा ‘बळी’

291

स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बळी’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर लाँच झाले आहे. चित्रपटाचे  दिग्दर्शन ‘लपाछपी’ फेम विशाल फुरिया यांनी केले आहे. ‘बळी’ ही ‘जीसिम्स’चे अर्जुन सिंग बरान व कार्तिक निशाणदार यांची निर्मिती आहे.

चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यानंतर नक्की कथा काय असेल आणि यामध्ये नेमका स्वप्नील जोशी कोणत्या वेगळ्या लूक आणि भूमिकेमध्ये दिसणार आहे याची उत्सुकता आहे. पुढील वर्षी चित्रपट प्रदर्शित होईल. पोस्टरमध्ये एक क्रॉस दिसत असून काहीतरी गंभीर घडते आहे, असे त्यातून प्रतीत होते. हा भयपट असण्याची शक्यता आहे.

स्वप्नील जोशी म्हणाला, ‘बळी’ चित्रपटाच्या माध्यमातून मी हॉरर चित्रपटांच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. हा चित्रपट मला माझ्या आवडीच्या लोकांबरोबर करायची संधी मिळत असल्याचा अधिक आनंद मला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या