
मुंबईच्या शरीरसौष्ठव क्षेत्राला एकापेक्षा एक शरीरसौष्ठवपटू घडवून देणाऱ्या प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या ‘स्वामी समर्थ श्री 2026’ स्पर्धेत इमेज फिटनेसचा स्वप्नील सकपाळ विजेता ठरला. तसेच आंतर व्यायामशाळा झालेल्या स्पर्धेत ऋषिकेश पांगारकरने बाजी मारली.
मुंबईच्या क्रीडा क्षेत्रात खेळाडू निर्मितीसह दिमाखदार स्पर्धा आयोजनाचा लौकिक असलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत दादर-प्रभादेवीतील होतकरू आणि उदयोन्मुख खेळाडूंनी मोठय़ा संख्येने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत विभागातील आखीव रेखीव देहयष्टीच्या पीळदार खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाने विजेत्या खेळाडूंना घसघशीत पुरस्काराने गौरविले. विजेता ‘स्वामी समर्थ श्री’ चषकासह 11 हजार रुपयांचा मानकरी ठरला. तसेच गटातील अव्वल पाच खेळाडूंवरही 30 हजार रुपयांचा वर्षाव करण्यात आला.
स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा मंडळाचे प्रमुख कार्यवाह आणि आमदार महेश सावंत यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सुनील देसाई, कार्याध्यक्ष गिरीश सव्रे, उपाध्यक्ष संजय भगत, बाबल नाईक, कोषाध्यक्ष प्रकाश पवार, अरुण खडपे, संयुक्त कार्यवाह आणि व्यायाम विभागप्रमुख जयराम शेलार उपस्थित होते.
स्वामी समर्थ श्री 2026 (खुला गट) स्पर्धेचा निकाल
60 किलो ः 1. कुलदीप वाघधरे, 2. दीपक गायकवाड, 3. ऋषिकेश पांगारकर, 4. प्रथमेश गावडे, 5. प्रणय रहाटे
65 किलो ः 1. सचेंद्र भारती, 2. रचित आचरेकर, 3. शुभम कदम, 4. राज चौहान, 5. अनिकेत पाटील.
70 किलो ः 1. स्वप्नील सकपाळ, 2. अभिषेक पासी, 3. राज विवेक, 4. आदिनाथ पेडणेकर, 5. प्रज्ञेश मुरकर.
75 किलो ः 1. अभिषेक कांबळे, 2. स्वप्नील जाधव,3. शुभम सकपाळ.
मेन फिजिक्स ः 1. दीपक गायकवाड, 2. ऋतिकेश पवार, 3. प्रथमेश गावडे,
4. अनिकेत पाटील, 5.आयरेश प्रभावळकर.
स्वामी समर्थ श्री 2026 चा विजेता ः स्वप्नील सकपाळ (इमेज फिटनेस),
स्वामी समर्थ श्री 2026 (आंतर व्यायामशाळा) ः ऋषिकेश पांगारकर.



























































