Video – ‘आंटी’ म्हणाल्याने स्वरा भास्करने चिमुरड्याला शिवी दिली

3271

स्वरा भास्कर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या अभिनयाऐवजी तिच्या विधानांमुळे जास्त चर्चेत राहायला लागली आहे. नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील विधानांमुळे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये कन्हैय्याकुमारसाठी केलेल्या जाहीर प्रचारामुळे ती जास्तच प्रकाशझोतात आली होती. स्वरावर टीका करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून तिने या टीकाकारांना तिच्यावर टीका करायची आयती संधी मिळवून दिली आहे.

सन ऑफ अबिश नावाच्या एका शोमध्ये स्वरा भास्करला गप्पा मारण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाने तिला अभिनयाला सुरुवात कशी झाली याबाबत एक प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना तिने सांगितले की तिची सुरूवात एका जाहिरातीपासून झाली होती. दाक्षिणात्य भाषेमध्ये ही साबणाची जाहिरात तयार झाली होती. या जाहिरातीमध्ये स्वरासोबत एक चार वर्षांचा मुलगाही होता. त्याने स्वराला बघून आंटी असं म्हटलं. हा किस्सा सांगत असताना स्वराने म्हटले की ‘माझ्या करिअरला सुरूवातही झाली नव्हती आणि या ‘#$%’ (शिवी) मुलाने मला आंटी म्हटलं. त्या मुलाला चित्रीकरण सुरू असतानाच ‘शू’ ला लागली होती. वारंवार विनंती करूनही त्याला त्यासाठी सोडण्यात आलं नव्हतं. यावर स्वराने दिग्दर्शकाला या मुलाला शू लागल्याचे सांगितले. सहाय्यक दिग्दर्शकाने दुर्लक्ष केले. त्यामुळे मला त्या ‘कमीन्या’ मुलावर दया आली’ असं स्वराने या मुलाखतीत म्हटलं आहे. पुढे स्वरा असं म्हणाली की ‘त्या मुलाने ‘माझं काम झालं’ असं सांगितलं. आणि शू केलेल्या पाण्यातच जाहिरात पार पडली. ही जाहिरात झाल्यानंतर मी घरी गेल्यावर फिनाईलने आंघोळ केली’

हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडीओवरून स्वरा भास्करला तिच्यावर टीका करणाऱ्यांनी ‘स्वरा आंटी’ म्हणून चिडवायला सुरुवात केली आहे. ट्विटरवर हा ट्रेंड प्रचंड व्हायरल झाला असून त्याआधारे नेटीझन्सनी स्वराला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. यातील काही ट्विट ही खालीलप्रमाणे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या