
महापालिकेतील एका मुकादमासह झाडुवाल्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 10 हजार रुपयांची लाच घेताना लाच रंगेहात पकडले आहे. रवी लोंढे व हर्षल ज्ञानेश्वर अडागळे (वय 31) असे पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय येथे रवी मुकादम म्हणून नोकरी करतात. तर हर्षल झाडुवाला आहे. यातील 36 वर्षीय तक्रारदार कचरा मोटार बिगारी कामगार आहेत. तक्रारदार यांची नाईट ड्युटी चालू ठेवण्यासाठी तसेच किटक विभागात बदली न करण्यासाठी मुकादम रवी लोंढे याने त्यांच्याकडे 15 हजार रुपयांची लाचेच्या मागणी केली होती. त्यानंतर झालेल्या चर्चेतून त्यांनी तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचेची रक्कम हर्षलकडे देण्यास सांगितले होते. याबाबत तक्रारदार त्यानी एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार, आज सापळा कारवाई करण्यात आली असता हर्षल याला लाच घेताना पकडण्यात आले.




























































