उरणमध्ये रंगली जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा

307

विजय विकास सामाजिक संस्थेच्या वतीने उरणमध्ये जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध वयोगटात आणि चार स्ट्रोकमध्ये उरण शहरातील बाळासाहेब ठाकरे स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे रविवारी झालेल्या स्पर्धेत जिल्ह्यातील 530 स्पर्धक सहभागी झाले होते. जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी व जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांच्याहस्ते करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक खेळाडूंना पदके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक अतुल आहेर, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, उरण शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, शहर प्रमुख विनोद म्हात्रे, विकास भोईर आदी मान्यवर आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या