
सामना ऑनलाईन। सिडनी
न्यूझीलंडमध्ये स्ट्रॉबेरीत सुई सापडल्याची घटना ताजी असतानाच ऑस्ट्रेलियात एका महिलेला सफरचंदात सुई सापडली आहे. सिडनीतील वुलवोर्थ्स येथून तिने सफरचंद विकत घेतले होते. त्यातील एका सफरचंदात सुई सापडली आहे. दरम्यान, या घटनेनंतर ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये होणारा फळांचा व्यापार थांबविण्यात आला आहे.
संबंधित महिलेने सोमवारी ‘द पांड्स’ येथील एका सुपर मार्केटमधून सहा सफरचंद असलेले एक पाकीट विकत घेतले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सफरचंद कापताच त्यात सुई आढळल्याने महिला हैराण झाली. तिने याबद्दल तत्काळ पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवले. त्यानंतर ज्या सुपर मार्केटमधून महिलेने फळं घेतली होती. तेथील सर्व फळं जप्त करण्यात आली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे बॅकटाऊन येथेही केळ्यामध्ये सुई सापडल्याची घटना घडली होती. पण त्याचा या घटनेशी काहीही संबंध नाही असे पोलिसांनी सांगितले असून तपास सुरू असल्याचे म्हटले आहे.
summary-sydney-needle-in-apple




























































