सुपर ओव्हरचा थरार! न्यूझीलंडसाठी साऊदी ‘अनलकी’, टीम इंडियासाठी बुमराह ‘लकी’

1582

टीम इंडियाने शुक्रवारी हॅमिल्टन येथील सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला आणि न्यूझीलंडला पुन्हा एकदा पराभव सहन करावा लागला. हॅमिल्टनमधील तिसरा सामनाही टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये जिंकला होता. या लढतीत रोहितने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत विजय मिळवून दिला, तर शुक्रवारी झालेल्या लढतीत कर्णधार विराट कोहली याने चौकार ठोकत संघाला विजयी केले. न्यूझीलंडकडून दोन्ही लढतीत अनुभवी गोलंदाज टीम साऊदी याने गोलंदाजी केली, मात्र तो संघाला विजयी करू शकला नाही.

#INDvxNZ शार्दुलकडून शमीच्या कामगिरीची पुनरावृत्ती, अखेरच्या षटकात सामना फिरवला

सुपर ओव्हरमध्ये टीम साऊदी न्यूझीलंडसाठी आतापर्यंत अनलकी ठरला आहे, तर जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी लकी ठरल्याचे दिसते. न्यूझीलंडने आतापर्यंत सहावेळा सुपर ओव्हर खेळली आहे. या सर्व लढतीत साऊदीने गोलंदाजी केली असून फक्त एका लढतीत तो न्यूझीलंडला विजयी करू शकला आहे. दुसरीकडे बुमराहने चार वेळा (दोन लढती आयपीएलमधील) सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली असून चारही लढतीत त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे.

साऊदीची आकडेवारी –
28 फेब्रुवारी 2010 ला क्राईस्टचर्चमध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात सामना झाला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 214 धावा केल्या, प्रत्युत्तराखाल ऑस्ट्रेलियाचा संघही 14 धावा करू शकला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये साऊदीने ऑस्ट्रेलियाला फक्त 6 धावा करू दिल्या. 7 धावांचे आव्हान न्यूझीलंडने पार करत सामना जिंकला.

22 सप्टेंबर, 2012 ला पालेकेले येथे श्रीलंकेविरुद्ध झालेल्या लढतीत दोन्ही संघ 174 धावा करू शकले. टाय झालेला सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला. श्रीलंकेने साऊदीच्या गोलंदाजीवर सुपर ओव्हरमध्ये 13 धावा केल्या आणि न्यूझीलंड फक्त 7 धावा करू शकला.

टी-20 क्रिकेटमध्ये किती लढतींचा निकाल सुपर ओव्हरने लागला? वाचा एका क्लिकवर…

1 ऑक्टोबर, 2012 ला पालेकेले येथे वेस्ट इंडीजविरुद्ध झालेला सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला. दोन्ही संघ 139 धावा करू शकले. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 17 धावा केल्या, परंतु साऊदीच्या गोलंदाजीवर अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत वेस्ट इंडीजने हा सामना आपल्या नाववर केला.

10 नोव्हेंबर, 2019 ला ऑकलंडमध्ये खेळताना न्यूझीलंड आणि इंग्लंडचा संघ 147 धावांवर बाद झाला. सुपर ओव्हरमध्ये साऊदीच्या गोलंदाजीवर इंग्लंडने 17 धावा चोपल्या. प्रत्तुत्तरादाखल न्यूझीलंडचा संघ फक्त 8 धावा करू शकला आणि सामना गमावला.

क्रीडाप्रेमींना पर्वणी, दोन दिवसात दोन सुपर ओव्हर; टीम इंडिया विजयी, न्यूझीलंड पुन्हा पराभूत

29 जानेवारी, 2020 ला हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघाने 179 धावा केल्या. यानंतर सुपर ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर न्यूझीलंडने 17 धावा केल्या. न्यूझीलंडने दिलेल्या 18 धावांचे आव्हान टीम इंडियाने पार केले आणि विजय मिळवला. या लढतीतही साऊदीने सुपर ओव्हर फेकली.

31 जानेवारी 2020 ला पुन्हा एकदा न्यूझीलंड आणि हिंदुस्थानमध्ये सामना टाय झाला. दोन्ही संघ 165 धावा करू शकले. सुपर ओव्हरमध्ये बुमराहच्या गोलंदाजीवर न्यूझीलंडने 14 धावा केल्या. प्रत्तुत्तरादाखल टीम इंडियाने 16 धावा करत सामना जिंकला.

बुमराह ‘लकी’
न्यूझीलंडविरुद्ध दोन लढतींसह बुमराहने आयपीएलमध्ये दोनता आपल्या संघाला सुपर ओव्हरमध्ये विजयी केले आहे. गुजरात लायन्सकडून खेळताना बुमराहने राजकोटच्या संघाविरुद्ध फक्त चार धावा देत सामना जिंकून दिला होता, तर सनरायझर्सविरुद्ध खेळताना मुंबईलाही विजयी केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या