T20 World Cup – पाकिस्तानच्या रडकुंडीवर सुनील गावसकरांचं परखड मत, ICC ला दिला मोलाचा सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी20 वर्ल्ड कप 2026 चे धुमशान दोन दिवसांनी सुरू होणार आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याची चाहत्यांना उत्कंठा होती. मात्र, पाकिस्तानने हिंदुस्थानविरुद्ध खेळण्यास नकार दिल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानच्या या रडकुंडीवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. आता हिंदुस्थानचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी सुद्धा भाष्य केलं असून ICC ला एक सल्ला दिला आहे.

सुनील गावसकर आपल्या परखड आणि रोखठोक मतांसाठी ओळखले जातात. त्यांनी पाकिस्तानच्या आडमुठेपणावरून त्यांना फटकारलं असून ICC ला मोलाचा सल्ला दिला आहे. जेणेकरून भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. ते म्हणाले की, “हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये नसावेत. 2007 च्या टी20 वर्ल्ड कपनंतर ICC ने दोन्ही संघांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले, जेणेकरून दोन्ही संघांमध्ये सामना होईल.” सुनील गावसकर यांनी ICC च्या याच प्रयत्नांना खोदून काढलं आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी हिंदुस्थानवर कोणताही दबाव नाहीये. मागील काही वर्षांमध्ये हिंदुस्थानची पाकिस्ताविरुद्धची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. तसेच पाकिस्तान जर हिंदुस्थानविरुद्ध खेळणार नसेल, तर हिंदुस्थानला सरळ दोन अंक मिळतील. त्यामुळे पाकिस्तानच्या या निर्णयामुळे टीम इंडियाचे कोणतेही नुकसान होणार नाही.