ताडदेव आरटीओमध्ये आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हजारो वाहनांची नोंद तसेच चालक परवाना देण्याचे महत्त्वाचे काम चालणाऱ्या ताडदेव आरटीओ कार्यालयात रविवारी आग लागली. या आगीत आरटीओची १५ ते २० केबिन्स जळाली असून शेकडो संगणक तसेच कागदपत्रे भस्मसात झाली आहेत. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

ताडदेव येथील आरटीओ कार्यालयाला सकाळी ५.३०च्या सुमारास आग लागली. आठ फायर इंजिन आणि पाण्याच्या दोन टँकरच्या सहाय्याने तीन तास या आगीशी झुंज दिल्यानंतर अग्निशमन दलाला ती पूर्णतः विझविण्यात यश आले. सकाळी ८.१० वाजण्याच्या सुमारास ही आग विझली. या आगीत इलेक्ट्रिक वायरिंग, फर्निचर, संगणक, प्रिंटर्स  जळून खाक झाले. पहाटेच्या सुमारास कार्यालयांत कोणीही उपस्थित नसल्याने जीवितहानी झाली नाही.