टेक केअर गुड नाइटचा भन्नाट टीझर आला

8

सामना ऑनलाईन । मुंबई

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि एस. पी. एंटरटेन्मेंट प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट टेक केअर गुड नाइट या चित्रपटाचा भन्नाट टीझर नुकताच लॉन्च करण्यात आला. एका  कुटुंबाने एकत्रितपणे सायबर गुन्हेगारांविरोधात दिलेला लढा चित्रपटात दाखवण्यात आला आहे. हा लढा देताना त्यांना कशापध्दतीने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते हे चित्रपटातून मांडण्यात आले आहे.

31 ऑगस्ट रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून गिरीश जयंत जोशी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची निर्मिती हिमांशू पाटील आणि महेश मांजरेकर यांची असून नरेंद्र भिडे यांचे संगीत आहे. सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्ण पेठे यांच्या चित्रपटात प्रमूख भुमिका आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या