
सामना ऑनलाईन । पुणे
सत्यमेव जयेत वॉटर कप स्पर्धेत सातारा जिह्यातील (ता. माण) टाकेवाडी गावाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यांना 75 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान, भांडकली (ता. माण, जि. सातारा) आणि सिंदखेडा (ता. मोताळा, जि. बुलढाणा या गावांना द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला आहे. त्यांना प्रत्येकी 25 लाखांचे पारितोषिक देण्यात आले. तसेच आनंदकाडी (ता. आष्टी, जि. बीड) आणि उमठा (ता. नरखेड, जि. नागपूर) या दोन गावांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला असून त्यांना प्रत्येकी 20 लाखांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
पाणी फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘सत्यमेव जयते कॉटर कप 2018’ या स्पर्धेतील किजेत्या गाकांना मुख्यमंत्री फडणकीस यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले त्या केळी ते बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, किरोधी पक्षनेते राधाकृष्ण किखे-पाटील, जलसंधारण राज्यमंत्री किजय शिकतारे, गृहराज्य मंत्री राम शिंदे, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चक्हाण, माजी उपमख्यमंत्री अजित पकार, पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेते आमीर खान, किरण राक, फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, प्रमुख मार्गदर्शक डॉ. अकिनाश पोळ आदी या केळी उपस्थित होते.
इतक्या वर्षांचा इरिगेशनचा पैसा गेला कुठे?
1960 साली संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हापासून 2018 म्हणजे आत्तापर्यंत राज्यात इरिगेशनचे काम सुरू आहे. यात अगोदरचे सरकार आणि आताच्याही सरकारचा समावेश आहे. तरी आतापर्यंत जलसंधारणाचे काम झालेले नाही, मग इतक्या वर्षांचा इरिगेशनचा पैसा गेला कुठे? जी जागृती इरिगेशन विभागाने करायला हवी ती आमीर खानला का करावी लागते? आतापर्यंत इरिगेशन विभागात जेवढे पाणी मुरले त्यात महाराष्ट्रातील पाण्याची पातऴी वाढली असती असा टोला राज ठाकरे यांनी अजित पवार व मुख्यमंत्र्यांना लगावला.
काही लोक बोलघेवडय़ासारखे बोलून जातात!
काही लोक बोलघेवडय़ासारखे बोलून जातात. त्यांनी कधी काही केले नाही आणि त्यांना काही करायचेही नाही. फक्त सभेत बोलायचे असते असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना लगावला. आमीर खानने सुरू केलेले काम कौतुकास्पद आहे. फक्त आमीरने कुठल्याही राजकीय व्यासपीठावर जाऊ नये. आमीरवर अद्यापपर्यंत कुणाचा शिक्का नाही. त्यामुळे आमीरच्या आवाहनाला लोक साद देत आहेत. हे असेच रहिले तर फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र आमीरला डोक्यावर घेईल, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
जातीपाती, गटतट विसरल्यास महाराष्ट्र पाणीदार होईल!
गावागावातील जातीपाती, गटतट आणि पक्षीय राजकारण हे जलसंधारणाच्या कामातील प्रमुख अडथळे आहेत. या गोष्टींमुळे गावांतील लोक एकत्र येत नाहीत. परिणामी, लोकचळवळ उभी राहत नाही. त्यामुळे गावागावतील जातीपाती, गटातटाचे राजकारण विसरून काम केल्यास महाराष्ट्र नक्कीच पाणीदार होईल, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे व अजित पवार यांच्या मतांवर भाष्य करताना केले. दरम्यान, महाराष्ट्रात पाणी प्रश्नात कोणीही राजकारण आणणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

























































