तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भूमी अभिलेख विभागाने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱया परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबरदरम्यान ही परीक्षा तीन सत्रांत घेण्यात येणार आहे. राज्यभरातून तलाठी पदाच्या 4 हजार 466 जागांसाठी तब्बल 11 लाख 10 हजार 53 उमेदवारांनी नोंदणी केली आहे.

उमेदवारांना परीक्षा पेंद्राचे नाव परीक्षेच्या किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक जिह्यात परीक्षा पेंद्र असणार आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार असून सकाळी 9 ते 11, दुपारी 12.30 ते 2.30 आणि सायंकाळी 4.30 ते 6.30 अशी वेळ परीक्षेसाठी निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा पेंद्र मात्र तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच दिसणार आहे.

तलाठी पदासाठी एकूण 200 गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्यासाठी एकूण गुणांच्या किमान 45 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात 23, 24, 25 ऑगस्ट तसेच 2, 3, 7, 9, 11, 12 आणि 13 सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.
परीक्षेचे टप्पे
■ पहिला – 17, 18, 19, 20, 21, 22 ऑगस्ट
■ दुसरा – 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर
■ तिसरा – 4 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर