
अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारने महिलांसाठी असलेल्या गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापरास बंदी घातली आहे. जर एखाद्या क्लिनिकने या औषधांची विक्री केली तर क्लिनिक बंद करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली आहे. या धमकीमुळे देशभरातील क्लिनिक बंद होत आहेत. गर्भनिरोधक गोळ्या न मिळाल्याने महिलांना गर्भधारणा किंवा गर्भपातावर उपचार मिळणे मुश्कील झाले आहे. तालिबान सत्तेत आल्यापासून गर्भनिरोधक गोळ्या वेगाने संपत आहेत. येथे 70 पैकी 30 महिलांना याची गरज होती, असे एका डॉक्टराने सांगितले. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय निधी कमी झाल्यामुळे अफगाणिस्तानमधील 440 हून अधिक रुग्णालये आणि दवाखाने बंद पडले.

























































