आता टायपिंगची कटकट मिटली! कू ऍपवर ‘टॉक टू टाईप’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देसी ट्विटर म्हणून ओळखल्या जाणाऱया कू ऍपवर नुकतेच टॉक टू टाईप हे फीचर लाँच झाले आहे. त्यामुळे युजर्स आता फक्त बोलून पोस्ट टाईप करू शकणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे फीचर मराठीसह हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि बंगाली या प्रादेशिक भाषांना सपोर्ट करणार आहे. असे फीचर लाँच करणारे हे पहिलेच ऍप ठरले आहे.

सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाईप करताना युजर्सना अनेक अडचणी येतात. मात्र टॉक टू टाईप फीचरमुळे युजर्स आपल्या स्थानिक भाषेत व्यक्त होऊ शकतील. पोस्ट करण्यासाठी 140 शब्दांची मर्यादा असून व्हॉईस आणि व्हिडियो मेसेजचेदेखील पर्याय उपलब्ध आहेत. आतापर्यंत या ऍपसोबत 55 लाखांहून अधिक युजर्स जोडले गेले आहेत.