‘फायटर’ आजी-आजोबा भिडले, चोरांना चोपले, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

1088
elderly-couple-fight

सामना ऑनलाईन । चेन्नई

घर लुटण्यासाठी आलेल्या चोरांच्या जीवघेण्या हल्ल्यानंतर देखील न घाबरता त्यांच्यावर प्रतिहल्ला चढवत पळवून लावणाऱ्या फायटर आजी आजोबांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तामिळनाडूच्या तिरुनेलवेली या भागात घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या ‘फायटर’ आजी-आजोबांचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

तामिळनाडूच्या तिरुनेलवेली भागात एका वृद्ध दांपत्य राहते. या वृद्ध दांपत्याचे घर लुटण्यासाठी दोन चोर आले होते. घरातील आजोबा ओसरीवर एकटे वाचन करत होते. इतक्यात मागून आलेल्या एका चोरट्याने त्यांच्या गळ्यात कपडा अडकवून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. आजोबांचा आवाज ऐकून आजी बाहेर आल्या. इतक्यात दुसरा चोरही तिथे आला. दोघांच्या हातात कोयते होते. आजोबा त्यांच्या हातून सुटण्याचा प्रयत्न करत होते. आजींनी बिलकूल घाबरून न जाता हातात येईल ती वस्तू फेकून मारण्यास सुरुवात केली. चप्पल, झाडू, पायदाणांच्या माऱ्याने चोरांनी आजोबांना सोडले. त्यानंतर आजोबांनी देखीला आजीला साथ देत छोटे स्टूल, खुर्ची चोरट्यांवर फेकली. आजी-आजोबांचा हा रौद्र अवतार पाहून दोघेही चोरटे घाबरले आणि त्यांनी धूम ठोकली. आजी-आजोबांचे हे साहस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून व्हिडीओला प्रचंड लाईक्स मिळत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या