
तमिळ सुपरस्टार आणि तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) चे प्रमुख विजय यांची पत्नी संगीता यांनी २४ फेब्रुवारीला चेंगलपट्टू फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. या याचिकेत विजयवर एका अभिनेत्रीसोबत अवैध संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. न्यायालयाने याचिका स्वीकारली आणि प्रकरण कुटुंब कल्याण समितीकडे पाठवले. हे जोडपे गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहत आहेत. त्यांच्या लग्नाला २७ वर्षे झाली असून, न्यायालय या प्रकरणाची पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी करणार आहे. विजयच्या टीमने आणि संगीताने अद्याप या प्रकरणावर कोणतेही अधिकृत भाष्य केले नाही.
विजय आणि संगीता यांच्या लग्नाला २७ वर्षे झाली असून, २५ ऑगस्ट १९९९ ला हे जोडपे लग्नबंधनात अडकले. त्यावेळी हिंदू आणि ख्रिश्चन दोन्ही धर्मात विवाहित असलेल्या या जोडप्याला २००० मध्ये त्यांचे पहिले मूल जन्माला आले होते आणि २००५ मध्ये एका मुलीला जन्म दिला होता.




























































