
सुमारे 20 वर्षांनंतर टाटा उद्योगसमुहाचा IPO येणार आहे. या आयपीओची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा होती. आता अखेर प्रतीक्षा संपली असून Tata Technologies चा IPO 22 नोव्हेंबरला येत आहे. गुंतवणूकदार 24 नोव्हेंबरपर्यंत आयपोओ खरेदी करता येणार आहे.
बाजारात टाटांच्या या IPO ची आतुरतेने प्रतीक्षा होत आहेत. टाटा टेक्नॉलॉजीज ही टाटा मोटर्सची उपकंपनी आहे आणि या IPO द्वारे समूहाने तिला स्वतंत्र कंपनी म्हणून सूचीबद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्हीसुद्धा या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही चांगली संधी आहे.
Tata Technologies चा हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेलद्वारे येत आहे. म्हणजेच टाटा मोटर्स, टाटा कॅपिटल ग्रोथ फंड आणि अल्फा टीसी होल्डिंग या इश्यूद्वारे त्यांचे स्टेक विकणार आहेत. या IPO द्वारे एकूण 60,850,278 इक्विटी शेअर्स विकले जाणार आहेत. यापैकी 46,275,000 इक्विटी शेअर्स टाटा टेक्नॉलॉजीज विकले जाणार आहेत. तर 9,716,953 इक्विटी शेअर्स अल्फा टीसी होल्डिंग आणि 4,858,425 इक्विटी शेअर्स टाटा कॅपिटल ग्रोथ फंडद्वारे विकले जाणार आहेत. कंपनीने 9 मार्च 2023 रोजी IPO साठी अर्ज दाखल केला होता.
टाटा टेक ही टाटा मोटर्सची उपकंपनी आहे. ही कंपनी अभियांत्रिकी सेवा तसेच तंत्रज्ञानावर आधारित सेवा पुरवते. ही कंपनी एरोस्पेस, यंत्रसामग्री आणि वाहतुकीसाठी तिच्या सेवा पुरवते. कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास 2023 च्या आर्थिक वर्षात कंपनीची कमाई 25 टक्क्यांनी वाढून 4418 कोटी रुपये झाली आहे. कंपनीचा नफा 708 कोटी रुपये होता. ज्यामध्ये सुमारे 63 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

























































