टीम इंडिया ढेपाळली; 217 मध्ये गारद

हिंदुस्थानी क्रिकेट संघाची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनल कसोटीची सुरुवात निराशाजनक झाली. रथीमहारथी फलंदाजांनी सजलेल्या टीम इंडियाचा पहिला डाव तिसऱया दिवशी 217 धावांमध्येच गडगडला. काईल जेमिसनने टीम इंडियाचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवत न्यूझीलंडला फ्रंटफूटवर नेले.

कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या खांद्यावर हिंदुस्थानी संघाची मदार होती. पण दोघेही लवकरच तंबूत परतले. त्यानंतर न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी टीम इंडियाच्या शेपटाला वळवळू दिले नाही.

69 धावांमध्ये सात फलंदाज गमावले

हिंदुस्थानने 3 बाद 146 या धावसंख्येवरून रविवारी पुढे खेळायला सुरुवात केली. काईल जेमिसनने विराट कोहलीला बाद केले तेव्हा टीम इंडियाची धावसंख्या होती 149 धावा. त्यानंतर 69 धावांमध्ये हिंदुस्थानचे सात फलंदाज बाद झाले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी वातावरण व खेळपट्टी या दोन्हींचा फायदा घेत टीम इंडियाच्या पहिल्या डावाला सुरुंग लावला.

आपली प्रतिक्रिया द्या