
टीम इंडियाचा वर्ल्ड कप विनर खेळाडू कुलदीप यादववर जर्मनीत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जर्मनीतील म्युनिक येथे कुलदीपवर शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून कुलदीप पाठीच्या दुखण्याने त्रस्त होता. शस्त्रक्रियेमुळे कुलदीपची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी निवड होऊ शकली नाही.
बीसीसीआयने कुलदीपला सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये उपचारासाठी पाठवले होते. मात्र त्याला काहीच फायदा झाला नाही. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. त्यानुसार कुलदीप शस्त्रक्रियेसाठी जर्मनीला गेला असून तेथे त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
कुलदीपने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत सर्जरीची माहिती दिली. चाहत्यांनी कुलदीपला लवकर कमबॅक करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पुढल्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी कुलदीप फेब्रुवारीपर्यंत मैदानात उतरण्याची शक्यता आहे.