Whatsapp Web Down – व्हॉट्सअ‍ॅप वेबमध्ये तांत्रिक बिघाड, युजर्सला फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडिया मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाला आहे. शुक्रवार सकाळपासून व्हॉट्सअ‍ॅप सेवा विस्कळीत झाली असून कॉम्प्युटर, लॅपटॉपवर लॉग इन करताना युजर्सला अडचणी येत आहेत. आयफोन युजर्सला याचा मोठा फटका बसला आहे. आयफोन युजर्सनी एक्सवर ट्वीट करत याबाबत तक्रार करत संताप व्यक्त केला आहे. मात्र अद्याप मेटाकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही.

सकाळी 8.30 वाजल्यापासून व्हॉट्सअ‍ॅप वेबमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. डाऊनडिटेक्टर वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आयफोन वापरणाऱ्या 56 टक्के युजर्सना व्हॉट्सअ‍ॅप वेब वापरण्यात, 39 टक्के युजर्सना अ‍ॅपमध्ये तर 6 टक्के युजर्सना व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजर वापरण्यात अडचण येत आहेत. यात 25 टक्के हिंदुस्थानी युजर्सचा समावेश आहे.

दरम्यान, ही तांत्रिक अडचण केवळ आयफोन युजर्सनाच होत असून अँड्रॉईड युजर्ससाठी सेवा सुरळीत सुरू आहे. आयफोन युजर्ससाठी सेवा कधी सुरळीत होईल याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले नाही.