वडाळा टी टी येथे मुलाची आत्महत्या

52
file photo

सामना प्रतिनिधी, मुंबई

वडाळा टी टी येथे आज एका 13 वर्षांच्या मुलाने 18 व्या मजल्यावरून गच्चीतून खाली उडी टाकल्याची घटना घडली. रियान चक्रवर्ती असे या मुलाचे नाव असून त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले ते मात्र समजू शकले नाही.

वडाळ्याच्या आयमॅक्स सिनेमागृहाजवळील गिरनार हाइटस् या 18 मजली टॉवरमध्ये 16 व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये रियान आईवडिलांसोबत राहत होता. तो सांताक्रुझ येथील पोदार शाळेत आठवी इयत्तेमध्ये शिकत होता. पालक कामाला गेलेले असताना रियान एकटाच घरात होता. दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास त्याने 18 व्या मजल्यावरील गच्चीतून खाली उडी टाकली. याप्रकरणी वडाळा टी टी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या