अनैसर्गिक संबंधासाठी त्रास देणाऱ्याचा गळा चिरून खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पुणे

अनैसर्गिक संबंधासाठी त्रास देणाऱ्या एकाचा गळा चिरून निर्घृण खून करणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले. बापू रामा केसकर (वय ४८, रा. शितोळे वस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शुभम बाळासाहेब आंबेकर आणि मयूर संतोष माने (दोघेही रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. तर मयत बापू यांचा मुलगा दत्तात्रय केसकर याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १६) कोरेगाव मुळ (ता. हवेली) येथे पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या झाडीत एका व्यक्तीचा गळा चिरून खून केलेला मृतदेह आढळून आला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तपासादरम्यान खून झालेली व्यक्ती बापू केसकर असल्याचे निष्पन्न झाले. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीवरून शुभम आंबेकर व मयूर माने यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता मयूरने आपणच बापूचा खून केल्याची कबुली दिली.

मृत बापू केसकर आपणास वारंवार फोन करून त्याच्यासोबत अनैर्सिगक संबंध ठेवण्याची मागणी करत असे. त्यास आपण नकार देत होतो, परंतु बापू वारंवार अनैर्सिगक संबंध ठेवण्याची मागणी करत असे. नेहमीच्याच त्रासाला कंटाळून संंबंध ठेवण्याच्या बहाण्याने त्याला कोरेगाव मूळ येथील वनखात्याच्या जागेत नेत धारदार हत्याराने गळा चिरून खून केल्याची कबुली मयूरने दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.