
“ज्या लोकांच्या नसांमध्ये सिंदूर वाहत होतं, तेच या सामन्याचे आयोजन करत आहेत.”, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर केली आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून त्यांनी ही टीका केली आहे.
माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना तेजस्वी यादव म्हणाले की, “ज्या लोकांच्या नसांमध्ये सिंदूर वाहत होतं, तेच या सामन्याचे आयोजन करत आहेत. पाकिस्तान हा भाजपचा भागीदार आहे. हे सर्वांना माहिती आहे. पण त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या नसांमध्ये सिंदूर वाहतं. कधी युद्धबंदी होते, कधी पाकिस्तान आणि हिंदुस्थन यांच्यात सामना होतो.”
आगामी बिहार निवडणुकीवरून तेजस्वी यादव आणि भाजप आणि जेडीयूवर टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, “एनडीए सरकारकडे स्वतःचे कोणतेही व्हिजन नाही. आमचे एक व्हिजन आहे, जे आम्ही सांगत आहोत, जर त्यांच्याकडे व्हिजन असेल तर त्यांनी ते सांगावे.”