लालूपुत्राचा भाजप आणि संघावर आरोप, लोकांनी उडवली खिल्ली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पाटणा

लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने आपल्याला ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. महुआ इथे जात असताना एक शस्त्रधारी माणूस आला आणि त्याने माझा हात पकडला, तो माणूस हात सोडायला तयारच नव्हता असं तेजप्रतापचं म्हणणं आहे. जर माझ्यासारखा माणूस सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय असा प्रश्नही तेजप्रताप यादवने विचारला आहे.

तेजप्रताप यादव यांनी केलेल्या आरोपावर लोकांनी ट्विटरवरून जाम खिल्ली उडवली आहे. तुला कोण मारेल ? तूच लालू प्रसाद यादव यांना सांगून स्वत:वर हल्ला करवला अशील असं काहींनी म्हटलंय तर काहींनी म्हटलंय की ही गुंडगिरी तुमचीच देणगी आहे.