
पेपरफुटीवरून टीका होऊ लागल्यानंतर आरजेडीचे प्रमुख लालू यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आरसा दाखवला. त्यांचे बंधू तेजस्वी यादव जेव्हा सत्तेत होते तेव्हा दोघा भावांनी कसे काम केले याबद्दल तेज प्रताप यादव यांनी एक्सवरून सांगितले. आपल्या सत्ताकाळात 17 महिन्यांत 4 लाखांहून अधिक नोकऱया उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नोकऱया उपलब्ध करून देण्याबरोबरच स्पर्धा परीक्षांमध्ये अजिबात पेपर फुटू दिला नाही. परीक्षा देणाऱयांवर अजिबात अन्याय होऊ दिला नाही, असेही तेजप्रताप यादव यांनी सांगितले. दरम्यान, जागावाटपाबद्दल ते म्हणाले. याबद्दल चर्चा सुरू असून आम्हाला कुठल्याही प्रकारची घाई नाही. चर्चेतून तोडगा निघाल्यानंतर तुम्हाला नक्कीच सांगू, एनडीएच्या लोकांना त्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही, असा टोलाही तेजप्रताप यादव यांनी लगावला.


























































