
तेलंगणामध्ये एका ऑटो चालकाने प्रवाशाकडून विसरलेली बॅग विनम्रपणे पोलिसांकडे सोपवली. या बॅगेत 13 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने होते. शेख खादीर असे या ऑटो चालकाचे नाव आहे. एस श्रीनिवास गौड हे शेख खादीर यांच्या ऑटोमध्ये आपली बॅग विसरले. ज्यात 12.5 तोळ्याचे सोने आणि काही रोख रक्कम होती. श्रीनिवास गौड हे बॅग विसरल्याचे ऑटो चालकाच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. पोलिसांनी श्रीनिवास यांचा तपास लावून त्यांना बॅग परत केली. पोलिसांनी ऑटो चालक शेख खादिर यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांचा विशेष सत्कार केला. यावेळी ऑटोचालकाला छोटी रोख रक्कमही बक्षीस म्हणून दिली.