मला एकटीला गेस्ट हाऊसवर बोलवायचे निर्माते, प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

चित्रपटाच्या चंदेरी दुनियेचं आकर्षण सर्वांनाच असतं. पण, चित्रपटांच्या सुंदर चेहऱ्यामागचं वास्तव कास्टिंग काउचच्या घटनांमधून वारंवार उघडकीला आलं आहे. हॉलिवूडपासून ते टॉलिवूडपर्यंत अनेक अभिनेत्री कास्टिंग काउचच्या बळी पडल्या आहेत. आता यात अजून एका प्रसिद्ध अभिनेत्रीची भर पडली आहे.

aamani-1

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री अमानी हिनेही कास्टिंग काऊचचा सामना केल्याचं म्हटलं आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला कित्येक नवीन निर्मात्यांनी आपल्याला अशी ऑफर दिल्याचं अमानीने म्हटलं आहे. मी नेहमी माझ्या आईसोबत शूटिंगला जात असे, पण अनेक निर्माते मला त्यांच्या गेस्ट हाऊसवर एकटीने बोलवत असत, असं अमानीने म्हटलं आहे. तामीळ चित्रपटसृष्टीत मोठ्या निर्मिती संस्थांकडून मात्र आपल्याला असे अनुभव आले नसल्याचंही तिने नमूद केलं आहे. ज्या निर्मिती संस्था नवीन आहेत, अशांकडूनच मला अशा मागण्या आल्याचा खुलासा अमानीने केला आहे.

चित्रपटसृष्टीत होणाऱ्या लैंगिक शोषणाविरुद्ध मीटू ही मोहीम राबवण्यात आली आहे. कास्टिंग काउचवरून चित्रपटजगतात नेहमीच विवाद होत असतात. काही काळापूर्वी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत होणाऱ्या लैंगिक शोषणाविरोधात श्रीरेड्डी या अभिनेत्रीने विवस्त्र होऊन निषेध केला होता. स्टुडिओ हा शोषणाचा अड्डाच असतो. किंबहुना अशा माणसांमुळे स्टुडिओ हा एक रेड लाईट एरिया बनल्याचा आरोप तिने केला होता.