लातूर जिल्ह्यात पारा चढला; महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद

1073

लातूर जिल्ह्यात तापमानाचा पारा सातत्याने चढतच आहे. यावर्षी मे महिन्यात लातूरचे तापमान 40 अंशापेक्षा जा्स्तच आहे. महिन्याभरात सर्वाधिक म्हणजे 44 अंशापर्यंत तापमान पोहचले होते. लातूरमध्ये गेल्या 4 दिवसात सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. दुपारी 3 ते 5 ही वेळ दिवसभरातील सर्वाधिक तापमानाचे तास ठरत आहेत.

कोरोनाचा प्रकोप सुरू असतानाच तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना उकाड्याचाही सामना करावा लागत आहे. मे महिन्यात लातूरचे तापमान 40 अंशापेक्षा जास्तच आहे. लातूर जिल्ह्यातील सर्वाधिक तापमान 44 अंशापर्यंत पोहचले होते.लातूरमध्ये 1 मे रोजी तापमान 41अंश होते. 2 मे ते 5 मेपर्यंत तापमान 43 अंशावर पोहचले होते. 6 ते 8 मेदरम्यान तापमान 44 अंशापर्यंत वाढले होते. तर 9 मे रोजी तापमानात घट झाली आणि ते 42 अंशावर आले. 10 आणि 11 मे रोजी तापमानात पुन्हा घट होऊन ते 40 अंशावर स्थिर झाले होते. 22 ते 24 मे या काळात पुन्हा तापमान 44 अंशापर्यंत वाढले होते. तापमानातील वाढ 30 मेपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या