विदर्भात पारा चढला; नागपूरमध्ये तापमान 45.6 अंश सेल्सियसवर

402

विदर्भात पारा चांगलाच चढला आहे. त्यामुळे तापमानात सातत्याने वाढ होत आहे. तापमान वाढल्याने उकाड्यामुळे नागरिकांची काहिली होत आहे. लॉकड़ाऊन असल्याने घराबाहेर पडता येत नसल्याने उकाड्यात घरात बसणे कठीण होत आहे. शुक्रवारी नागपूर, चंद्रपूर व अकोला येथे राज्यात सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आले. आगामी तीन दिवसात उष्णता आणखी वाढणार असून विदर्भात उष्णतेची लाट राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

नागपूरच्या पाऱ्याने 44.2 वरून 45.6 अंश सेल्सियसची वाढ नोंदवली आहे. अकोल्यात शुक्रवारी 45.2 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. चंद्रपूरमध्ये 45.5, यवतमाळ 44.5, वर्धा 44.5, गोंदिया 44.2, अमरावती 44.2, वाशिम 43.0, गडचिरोली 42.4, ब्रम्हपुरी 42.5 आणि बुलढाणा येथे 41.4 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या