टेम्पो पुलावरून नदीत कोसळला, चालक गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोखाडा – त्र्यंबकेश्वर मार्गावर वाघ नदीच्या पुलावरून भरधाव टेम्पो 150 फूट खाली कोसळल्याची घटना आज घडली. टेम्पो आणि कार समोरासमोर आल्यानंतर रस्त्याचा अंदाज न आल्याने टेम्पो नदीत कोसळला. या अपघातात टेम्पोचालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

मोखाड्यातील डॉ. आशिष जयस्वाल कारने नाशिकच्या दिशेने जात होते. तर मालवाहू आयशर टेम्पो नाशिकहून डहाणूकडे जात होता. यावेळी दोन्ही वाहने वाघ नदीच्या वळणावर समोरासमोर आली. यावेळी टेम्पो वेगात असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. टेम्पो कारला घासून पुलाचा कठडा तोडून 150 फूट खोल नदीत कोसळला. या अपघातात आशिष जयस्वाल थोडक्यात बचावले आहेत. टेम्पोचालक गंभीर जखमी असून त्याला तातडीने उपचारासाठी नाशिक रुग्णालयात हलवण्यात आले.