टेम्पो-पिकअप धडकेत दोन ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून आलेल्या पिकअपने जोराची धडक दिली. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. देवडी पाटी परिसरातील हॉटेल ‘श्रीकृष्ण’जवळ शुक्रवारी पहाटे ही घटना घडली.

रिझवान अब्दुल गणी शेख (वय 22, रा. वैजापूर, संभाजीनगर) व रिहान फैजल कयेश अल्ली (वय 35, रा. झारखंड) अशी मृतांची नावे आहेत.

कल्याणहून घर बदलल्याने घरातील सामान घेऊन सोलापूरकडे निघालेल्या आयशर टेम्पोच्या चालकाने चहा पिण्यासाठी टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला होता. याच वेळी पाठीमागून आलेल्या भरधाव पिकअपने टेम्पोला धडक दिली. यात शेख व अल्ली हे दोघे जागीच ठार झाले, तर पाठीमागे बसलेले दोघे जखमी झाले आहेत.