टेम्पो चोरणाऱ्या सराईताला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले

पुणे शहरातील चंदननगर परिसरातून टेम्पो चोरणाऱ्या दुचाकीस्वार सराईताचा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली. पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासासाठी शहरातील तब्बल 175 सीसीटीव्हींचे फुटेज धुंडाळून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. राहुल छगन फडतरे (वय 23, रा. वडकी गाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

चंदननगर तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचारी टेम्पोचा शोध घेत असताना अंमलदार अमित काबंळे, राहुल इंगळे यांना सराईताची माहिती मिळाली. आरोपी वडकीतील राहत्या घरी येणार असल्याचे समजात पथकाने सापळा रचून परिसरात दबा धरला. त्यावेळी सराईत राहूल दुचाकीवर भरधाव वेगाने येताना पोलिसांना दिसला. पोलिसांची चाहूल लागताच तो भरधाव वेगाने पुढे जात होता. त्यावेळी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन लाखांचा टेम्पो जप्त करण्यात आला. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जाधव, पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, युसुफ पठाण, तुषार भिवरकर, श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, अमित कांबळे, राहुल इंगळे, सुभाष आव्हाड, नामदेव गडदरे, अतुल जाधव यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या