हनुमान जयंती उत्सवादरम्यान मंदिरातील मंडप कोसळला, दुर्घटनेत 10 भाविक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणातील जगतियाल येथील एका मंदिरात उत्सवाला गालबोट लावणारी घटना घडली आहे. बुधवारी मंदिरातील तात्पुरता उभारण्यात आलेला मंडप कोसळल्याने 10 भाविक जखमी झाले आहेत. कोंडागट्टू श्री आंजनेय स्वामी मंदिराच्या आवारात ही घटना घडली. या घटनेमुळे मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला.

श्री आंजनेय स्वामी मंदिरात तीन दिवसीय ‘हनुमान चिन्ना जयंती’ उत्सव सुरू आहे. या उत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक मंदिरात आले होते. भाविकांसाठी मंदिराच्या आवारात तात्पुरते मंडप उभारण्यात आला होता. हा मंडप कोसळला. यात जखमी झालेल्या भाविकांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर भाविकांनी मंदिर प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.