पाकव्याप्त कश्मीरमध्ये पाकड्यांच्या हालचाली वाढल्या; अतिरिक्त कुमक तैनात

854

लडाख सीमेवर हिंदुस्थान आणि चीनमध्ये तणाव आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील हालचाली वाढवल्या आहेत. पूंछजवळील पाकव्याप्त कश्मीरमध्ये पाकिस्तानच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये पाकिस्तानने सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवायला सुरुवात केली आहे. पाकव्याप्त कश्मीरच्या कोटली, रावळकोट, विंभर, बाग, मुझफ्फराबाद या ठिकाणी पाकिस्तानने अतिरिक्त कुमक तैनात केली आहे. हिंदुस्थान -चीनमध्ये तणाव असतानाच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळही तणाव वाढवण्याचा पाकड्यांचा डाव आहे. तसेच मोठ्या घातपाताची शक्यता असल्याने सुरक्षा दलाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लडाख सीमेवर हिंदुस्थान-चीनमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाल्यानंतर पाकिस्तानने पाकव्याप्त कश्मीरमध्ये त्यांची लष्करी ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. पाकव्याप्त कश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागामध्ये सैन्याची कुमक वाढवण्यास सुरुवात केली आहे. पाकव्याप्त कश्मीरमध्ये पाकिस्तानने दुपटीने सैनिकांची संख्या वाढवली आहे. तसेच इराणच्या सीमेवर तैनात असलेली पाकिस्तानची कुमक पाकव्याप्त कश्मीरमध्ये तैनात करण्यात आली आहे. हिंदुस्थान-चीनमध्ये तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरही तणाव वाढवण्याचा पाकिस्तानचा डाव आहे.

गलवान खोऱ्यात चीनच्या हालचाली वाढताच पाकिस्ताननेही पाकव्याप्त कश्मीरमध्ये लष्करी ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. या भागात रात्रभर वाहनांची हालचाल दिसून येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठ्याची वाहतूक होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकव्याप्त कश्मीरमध्ये लष्करी सामर्थ्य वाढवण्यास पाकिस्तानला चीनने चिथावणी दिल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ सैनिकांची कुमक वाढवल्याने घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आठवड्याभरापासून पाकव्याप्त कश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या हालचाली वाढल्या असून सुरक्षा दल सर्व हालीचालीवर नजर ठेवत आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीमावर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिन्ही सैन्यदलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या