
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू-कश्मीरमधील अनंतनाग जिह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले, तर एक जवान आणि एक नागरिकही या हल्ल्यात जखमी झाला आहे. अनंतनाग जिह्यात अचबल चौकात तैनात असलेल्या सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एल. मीना आणि शिपाई संदीपसिंह यादव हे दोन जवान शहीद झाले तर एका जवानासह एक नागरिक जखमी झाला आहे. हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी पळ काढला. त्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू असल्याचे सुरक्षा दलाने सांगितले.या हल्ल्याची जबाबदारी लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे
























































