पुलवामात पोलीस अधिकाऱयाच्या घरात घुसून अंदाधुंद गोळीबार, दहशतवाद्यांनी संपूर्ण कुटुंब संपवलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीर खोऱयात दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी स्पेशल पोलीस ऑफिसरच्या घरात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. त्यात पोलीस अधिकाऱयाच्या संपूर्ण कुटुंबाचीच हत्या केली. यामुळे कश्मीरात खळबळ उडाली असून, हायअलर्ट जारी केला आहे. दक्षिण कश्मीरात अवंतीपोरा जिह्यातील हारीपारीगाम गावात रविवारी रात्री 11च्या सुमारास हे भयंकर हत्याकांड घडले.  या हल्ल्यामागे पाकिस्तानी संघटना जैश-ए-मोहम्मद असून, एक दहशतवादी सीमेपलीकडून आला होता अशी माहिती आहे.

जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी फयाज अहमद यांच्या घरात घुसले आणि अंदाधुंद गोळीबार केला. अहमद यांच्या शरीराची गोळय़ांनी चाळणी करण्यात आली. पोलीस अधिकारी अहमद यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नी राजा बेगम याचा हॉस्पिटलच्या वाटेवर असताना मृत्यू झाला. मुलगी रफिकाचा मृत्यू उपचार सुरू असताना झाला आहे.