मसूदची बहीण ’जैश’च्या महिला आघाडीची कमांडर

मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड, कुख्यात दहशतवादी मौलाना मसूद अजहरने ’जैश-ए-मोहम्मद’ची महिला आघाडी सुरू केली आहे. या आघाडीची धुरा त्याने आपली बहीण सादिया अजहर हिच्याकडे सोपवली आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान हिंदुस्थानी लष्कराने केलेल्या हल्ल्यात मसूद अजहरचे अनेक कुटुंबीय मारले गेले होते. त्यात सादियाचा नवरा युसूफ अजहर हा देखील होता. त्या धक्क्यातून सावरलेल्या अजहरने आता ’जैश’मध्ये नवी भरती सुरू केली आहे. तसेच, संघटनेत महिला विभाग सुरू केला आहे. जमात-उल-मोमिनात असे नाव त्याने या आघाडीला दिले आहे.