
राज्यातील शिक्षकांसाठी आयोजित केली जाणारी शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात येणार आहे. ‘टीईटी’ परीक्षा एक दिवस आधी म्हणजेच 30 ऑक्टोबरला होणार आहे.
31 ऑक्टोबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा होणार होती. ‘टीईटी’ आणि आरोग्य विभागाची परीक्षा एकाच दिवशी आल्याने आता ‘टीईटी’ची परीक्षा 31 ऑक्टोबरऐवजी 30 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले.






























































