ठाकरे सरकार दिव्यांगांना नक्कीच न्याय देईल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्ही माझ्या मनातील मुख्यमंत्री आहात, पुढील पाच वर्षात आपले सरकार दिव्यांगांना न्याय देईल, अशा शब्दांत नाशिकहून आलेल्या विजय म्हस्के यांनी मंळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रालयात भेट घेऊन भावना व्यक्त केल्या.

हँडीकॅप युनियनचे अध्यक्ष विजय म्हस्के यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना फोटोफ्रेम भेट दिली. विजय म्हस्के नाशिक जिह्यातील मानोरी गावातून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी खास मुंबईत आले होते. मंत्रालयातील बैठक आटोपून उद्धव ठाकरे तळमजल्यावर आले तेव्हा त्यांनी व्हिलचेअरवरील म्हस्के यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी त्यांची आस्थेने चौकशी केली.