
तमिळ सुपरस्टार आणि ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाचा अध्यक्ष विजय थलपथी याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पेरांबूर (Perambur) मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याने आपली एकूण ५२० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.
विजय कडे ४०५ कोटींची जंगम मालमत्ता आहे तर ११५ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. अशी एकूण 520 कोटींची संपत्ती त्यांच्याकडे आहे. या मालमत्तेमध्ये त्याचे आलिशान बंगले, महागड्या गाड्या, विविध कंपन्यांमधील शेअर्स आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, विजय यांच्यावर कोणतेही मोठे कर्ज नसल्याचेही या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.
स्वबळावर निवडणूक लढवत असलेल्या टीव्हीकेने रविवारी आपल्या 234 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. टीव्हीकेचा प्रमुख असलेला अभिनेता विजय हा दोन विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढवणार आहे. विजय हा स्वतः त्रिची पूर्व आणि चेन्नईमधील परम्बूर विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढवणार आहे.






























































