ठाणे लॉकडाऊन किया जाये? आज होणार निर्णय

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी अख्खे ठाणे शहर लॉकडाऊन करावे का यावर महापालिका उद्या मंगळवारी निर्णय घेणार आहे. आधी 1 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपासून ते 11 जुलैपर्यंत ठाण्यात कडकडीत लॉकडाऊन जारी करण्यात येणार असल्याची चर्चा होती, मात्र राज्य शासनाची लॉकडाऊनसंदर्भात नवीन नियमावली आल्याने त्याचा अभ्यास करूनच उद्या पुढील निर्णय घेऊन अधिसूचना काढण्यात येईल असे पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

दूध आणि औषधे वगळता संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये 10 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. भाजीपाला, किराणासह सर्व दुकाने, अंतर्गत वाहतुकीला बंदी असणाऱया या लॉकडाऊनसाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली होती. पण रात्री उशीरा पालिका प्रशासनाने लॉकडाऊनच्या निणऱयाला स्थगिती दिली आहे. अनलॉकनंतर लॉकडाऊनसंदर्भात सरकारने नवीन नियमावली दिली आहे. त्यानुसार केवळ कंटेन्मेंट झोन व हॉटस्पॉट क्षेत्रातच लॉकडाऊन करण्याचे निर्देश आहेत. ठाण्यात लॉकडाऊन केल्यास निर्देशाचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन नियमावलीचा अभ्यास करून मंगळवारी लॉकडाऊनविषयी अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे प्रशानसाने स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या