ठाण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश , दोन अभिनेत्रींची सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनमुळे हाती काम नसल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या दोन अभिनेत्रींना सेक्स रॅकेटच्या गर्तेत लोटणाऱया दोन दलालांना ठाण्यात बेडय़ा ठोकण्यात आल्या आहेत. यासोबतच हे सेक्स रॅकेट चालवण्यासाठी घर देणाऱया फ्लॅट मालकालाही पोलिसांनी अटक केली.

पाचपाखाडी येथील एचडीएफसी बँकेच्या मागे असलेल्या नटराज-एच या इमारतीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून सुनील ऊर्फ विशाल जैन, हसीना मेमन या दोघा दलालांसह घरमालक स्वीटी चढ्ढा हिला अटक करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या दोन्ही तरुणी हिंदी मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेत्री आहेत.

लॉकडाऊन असल्याने या दोन्ही अभिनेत्रींना चित्रपटसृष्टीत काम मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी हा मार्ग स्वीकारला, असे पोलीस चौकशीत समोर आले. मात्र या दोघींना या सेक्स रॅकेटमध्ये ओढणाऱया दलालांनी आणखी किती मॉडेल आणि तरुणींना वाममार्गाला लावले आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.