पक्षाचे एबी फॉर्म घेऊन पैशासाठी उमेदवारी मागे घेणाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा; शिवसेना-मनसेची पोलिसात तक्रार

ठाणे महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना पैशाचे आमिष दाखवून किंवा धमक्या देऊन उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावल्याचा गंभीर आरोप होत आहे. याच विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म घेऊनही पैशांसाठी उमेदवारी मागे घेणाऱ्या उमेदवारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेने श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे आणि मनसे नेते अविनाश जाधव उपस्थित होते.