कल्याण अत्याचारप्रकरणी दोषींना फाशी द्या! शिवसेनेची मागणी

कल्याण येथे बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीने केली. शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन दिले.

कल्याण येथे बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी शिवसेनेच्या महिला आघाडीने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कल्याण येथे तेरा वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. यातील प्रमुख संशयित विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. यावेळी शुभांगी पाटील, संगीता जोशी, अरुणा मोरे, जयश्री वानखेडे, ज्योती चौधरी उपस्थित होत्या.