
कल्याण-मुरबाड महामार्गावरील रायते उल्हास नदीमध्ये संध्याकाळी दोन तरुण बुडाले. शहाड, उल्हासनगर येथील आपले कुटुंब घेऊन छटपूजेसाठी रायते उल्हास नदी पुलाजवळ संध्याकाळी आले होते. पूजेची तयारी चालू असता दोन तरुण अंघोळीसाठी उल्हास नदीच्या पात्रात उतरले असता ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. प्रिन्स गुप्ता (15) व राजन विश्वकर्मा (18) असे त्यांचे नाव असून ते शहाड, उल्हासनगर येथील रहिवासी आहेत. घटनास्थळी टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी व त्यांची टीम, कल्याण अग्निशामक दलाच्या गाड्या व जवान, रायते येथील ग्रामस्थ, आदिवासी मुले यांच्याकडून रात्रीपासून शोधमोहीम सुरूच आहे.

























































