ठाण्याला दिलासा; कोरोनामुळे 24 तासात एकही मृत्यू नाही, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 47 टक्के

1523

ठाणे शहरासाठी दिलासादायक वृत्त असून गेल्या 24 तासात कोरोनामुळे शहरात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. तसेच आज 80 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 47 टक्के झाले आहे. आजपर्यंत 1 हजार 750 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 2 हजार 56 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती, ठाणे महानगरपालिकेने दिली आहे.

शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 124 रुग्ण आढळले आहेत. शहरात आजपर्यंत आजपर्यंत 113 रुग्णांचा मृत्यू झाला आऊन यात 75 पुरुष आणि 38 महिला रुग्णांचा समावेश आहे. मात्र गेल्या 24 तासात एकही मृत्यू झालेला नाही, हे दिलासादायक आहे.

रुग्णसंख्या वेगाने वाढतेय, पण इतर देशांच्या तुलनेत आपल्यासाठी ‘या’ 2 गोष्टी दिलासादायक

दरम्यान ठाणे महानगरपालिकेच्या वतीने खासगी आणि सरकारी लॅबच्या माध्यमातून कोरोना चाचणी करण्यात येत आहे..महानगरपालिकेने स्वतःच्या लॅब सुरू केली असल्याने इतर शहरांच्या तुलनेने ठाण्यात कोरोना तपासणीचे प्रमाण जास्त आहे.

आपली प्रतिक्रिया द्या