ठाणे ग्रामीणमध्येही 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांनी टाळेबंदीला मुदतवाढ दिल्यानंतर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ग्रामीण भागातही 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत तसेच जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आल्याचे आदेश त्यांनी काढले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने 12 जुलैपर्यंतचा लॉकडाऊन 19 जुलैपर्यंत वाढवला आहे.

त्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली महापलिका, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर महापालिकांच्या आयुक्तांनी लॉकडाऊन वाढवल्याचे जाहीर केले. महापालिका क्षेत्रांप्रमाणेच जिह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर वाढत असल्याने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी 12 जुलैला संपुष्टात येणाऱया लॉकडाऊनला 19 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अटी आणि नियम हे मागच्या लॉकडाऊनप्रमाणेच कायम राहतील, तर महापालिका हद्दीमध्ये आयुक्त यांचे आदेश लागू राहतील, असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.