ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षांची आज निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणे जिल्हा परिषदेचा नवा अध्यक्ष आज सोमवारी निवडला जाणार असून त्यासाठी दुपारी तीन वाजता विशेष सभेचे आयोजन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात ही प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून जिल्हा परिषदेचे 53 सदस्य तसेच पंचायत समित्यांचे पाच सभापती उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे बहुमत असल्याने अध्यक्षपदाची निवड बिनविरोध होणार आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा मंजुषा जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यामुळे ही निवडणूक होत असून उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून नामनिर्देशनपत्र दाखल होण्यास सुरुवात होईल. अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी  अध्यक्षपद राखीव असून ते कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.