‘छपाक’नंतर आता ‘थप्पड’ला विरोध

1930

दीपिका पदुकोणनंतर सीएएविरोधातील आंदोलनात सहभागी झालेल्या तापसी पन्नूवर आता निशाणा साधण्यात आला आहे. तापसीच्या आगामी ‘थप्पड’ या चित्रपटाविरोधात सोशल मीडियावर #BoycottThappad असा ट्रेंड सध्या सुरू आहे.

यापूर्वी जेएनयूमधील सीएएविरोधातील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या दीपिकाच्या ‘छपाक’ या चित्रपटाला विरोध करण्यात आला होता. त्यामुळे हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे कमाई करू शकला नाही. ‘छपाक’नंतर आता तापसी पन्नू स्टारर ‘थप्पड’ या चित्रपटालाही विरोध सुरू झाला आहे. हा चित्रपट शुक्रवारी 28 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. ‘थप्पड’चे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले आहे. तर मराठमोळय़ा मृण्मयी लागूने कथानक लिहिले आहे. प्रदर्शनाच्या तोंडावर चित्रपटाला विरोध होत असल्याने निर्मात्यांची चिंता वाढली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या